सरकारी योजना

कृषी व ग्रामविकास योजना

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY)

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरवून जलसंधारण वाढवणे आणि शेती उत्पादनक्षमता सुधारवणे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSA)

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा उद्देश म्हणजे शेती उत्पादनात वाढ करून देशातील अन्नसुरक्षा मजबूत करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.

जलयुक्त शिवार अभियान

जलयुक्त शिवार अभियान” हे शेतातील जलसंधारण वाढवून शेती सुधारण्यासाठी, पाणी साठवण आणि कृषी उत्पादन वृद्धीसाठी राबवले जाते.

स्मार्ट ग्राम योजना

स्मार्ट ग्राम योजना ग्रामीण भागात पायाभूत सुविधा, स्वच्छता, डिजिटलीकरण, जलसंधारण आणि सामाजिक विकास सुधारण्यासाठी राबवली जाते.

गृहनिर्माण व पायाभूत सुविधा योजना

प्रधानमंत्री आवास योजना (Gramin)

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ही गरजूंना सुरक्षित, दर्जेदार व किमान खर्चात घर मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारची योजना आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) ही ग्रामीण भागात स्वच्छता, पाण्याचा व्यवस्थित वापर आणि सार्वजनिक शौचालयांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रीत करणारी योजना आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA)

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना वार्षिक किमान 100 दिवस रोजगार व आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याची योजना आहे.

महिला व बालविकास योजना

सावित्रीबाई फुले महिला आर्थिक विकास महामंडळ योजना

सावित्रीबाई फुले महिला आर्थिक विकास महामंडळ योजना महिलांना आर्थिक सक्षमतेसाठी स्वरोजगार, कर्ज व व्यवसाय सुरू करण्यास मदत करते.

आंगणवाडी सेवा योजना

आंगणवाडी सेवा योजना ही लहान मुलं व गर्भवती महिलांसाठी पोषण, आरोग्य, लसीकरण व शिक्षण सुविधा प्रदान करणारी योजना आहे.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना मुलींच्या सुरक्षितता, शिक्षण आणि लिंग समतेस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार राबवते.

शिक्षण व सामाजिक सुरक्षा योजना

मिड डे मील योजना

मिड डे मील योजना शाळेतल्या विद्यार्थ्यांना पौष्टिक जेवण देऊन पोषण, शाळेची उपस्थिती आणि शिक्षण सुधारण्यासाठी राबवली जाते.

विद्यार्थी प्रोत्साहन योजना

विद्यार्थी प्रोत्साहन योजना ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य व सन्मान प्रदान करणारी योजना आहे.

संजय गांधी निराधार योजना

संजय गांधी निराधार योजना ही वयस्क, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निराधार व्यक्तींना आर्थिक मदत व आधारभूत सुविधा पुरवण्यासाठी राबवली जाते.